बाल संगोपन योजना 2023

 बालसंगोपन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र शासन बालसंगोपन योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थींना दरमहा 2250 रुपये मिळतात अगोदर ही रक्कम मिळत होती परंतु 31 जानेवारी 2023 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही रक्कम 2250 रुपये दरमहा करण्यात आली आहे बालसंगोपन योजनेचा लाभ 58 हजार पेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेत आहेत आणि बऱ्याच लोकांना या योजनेबद्दल माहिती नसल्यामुळे ते या योजनेच्या लाभांपासून वंचित आहेत तर या योजनेचा लाभ कसा घ्यावा या योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करावा अर्ज केल्यानंतर किती दिवसात लाभ मिळतो या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय असणार आहे पाहू जेणेकरून सर्वांना या योजनेविषयी माहिती होईल व सर्वच पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील बालसंगोपन योजना ही 2005 मध्ये केंद्र शासन व राज्य शासन अंतर्गत सुरु करण्यात आली परंतु ही योजना पूर्णपणे महाराष्ट्र राज्याच्या निधीतून राबवली जाते व फक्त महाराष्ट्रातील लाभार्थ्याची या योजनेचा लाभ घेऊ शकतात इतर राज्यातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ही योजना महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबविली जाते या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांना 2250 रुपयांची आर्थिक मदत ते त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते अगोदर अनुदानाची रक्कम 1100 रुपये प्रतिमा होती परंतु आता या रकमेत वाढ करण्यात आलेली आहे आता ही रक्कम 2250 रुपये प्रति महा करण्यात आलेली आहे बाल संगोपन योजनेच्या सहाय्यक अनुदानात मोठी वाढ.
🔘 महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या बाल संगोपन योजनेच्या सहाय्यक अनुदानात मोठी वाढ.
🔘 परिपोषण अनुदान : ₹ 1150 वरून ₹2500 ( पालक ₹1150 वरून ₹2250 / संस्था : ₹125 वरून ₹250 )
🔘 ₹ 76.72 कोटींचा अतिरिक्त खर्च करणार.
🔘 आता एकूण खर्च ₹ 150.16 कोटी.
♦️ कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतात ? ♦️

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

निराधार व गरजू बालक ज्या मुलांना आई किंवा वडील नसतील असे मूल ज्या मुलांना आई वडील दोन्ही नसतील असे मुल कोविड कालावधीत पालक गमावलेले मुल जे परिवार , आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी असमर्थ असतील ते बालके , मतिमंद मुले , अपंग मुले , दोन्ही पालक अपंग आहेत असे मुल एच व्ही आय ग्रस्त पालकांचे मुले , ज्या मुलांचे आई वडील गंभीर आजाराने रुग्णालयात भरती असतील ती मुले , जा पालकांचे बालक मानसिक रुग्ण आहेत ते बालके , ज्यांचे आई वडील घटस्फोटीत आहेत ती बालके , ज्या मुलांच्या पालकांना पत्ता लागत नाही अशी बालके जे दत्तक देणे शक्य होत नाही अशी बालके , जा बालकांना कुष्ठरोग झाला आहे असे बालके इत्यादी प्रकारे मुले या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत या पात्र मुलांना एका मुलासाठी 2250 ₹ दर महिन्याला मिळतात असे एका वर्षाला 27000 ₹ मिळतात. हे पैसे वय 18 पूर्ण होई पर्यंत दर महिन्याला मिळत जातात.
🔘 या योजनेचा लाभ घेण्यासाठीची पात्रता 🔘
1] लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
2] लाभार्थ्याचे वय 0 ते 18 वर्ष दरम्यान असावे.
3] अर्जदार या योजनेचा निकषात बसला पाहिजे.
4] एका कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांनाही या योजनेचा लाभ दिला जातो.
🔘 योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 🔘
1] या योजनेसाठी करावयाचा अर्जाचा नमुना ( कुठल्याही झेरॉक्सच्या दुकानात मिळून जाईल.)
2] मुलांचे शाळेचे बोनाफाईट सर्टिफिकेट / जन्म दाखला.
3] आधार कार्ड झेरॉक्स प्रत ( पालकांचे व बालकांचे )
4] तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला.
5] पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र ( आई किंवा वडील मृत्यू दाखला )
6] पालकांचा रहिवासी दाखला ( ग्रामपंचायत / नगरपालिका यांचा )
7] मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स.
8] मृत्यूचा अहवाल ( पालकांचा मृत्यू कशामुळे झाला ते उदा. कोविडने झाला असेल तर मृत्यू अहवाल )
9] रेशन कार्ड झेरॉक्स प्रत
10] राहत्या घरासमोर पालकासोबत बालकाचा फोटो ( 4 – 6 फोटो प्रत्येक मुलासोबत वेग वेगळा फोटो लागेल )
11] मुलाचे पासपोर्ट साईज फोटो दोन
12] पालकांचे पासपोर्ट साईज फोटो दोन
बाल संगोपन योजनेचा लाभ घेताना तुम्हाला एवढी कागदपत्रे लागतील सदर योजनेचा अर्ज भरून झाल्यावर हे सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत हा अर्ज मंजूर करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी बालकल्याण समिती कडे सादर केला जातो व ती समिती अर्ज मंजूर करते.

Leave a Comment