वारकरी संप्रदायासाठी महत्त्वाची बातमी

वारकरी बांधवांसाठी अतिशय मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे. पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून दिंड्या पालख्या पंढरपूर नगरीत येतात.

दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत किलोमीटर अंतर पार करून पंढरपूरला येतात परंतु बघूया प्रवासादरम्यान अनेकदा वारकरी आजारी पडतात. दुखापतग्रस्त होतात एखाद्या अपघातात किंवा दुर्घटनेत लोकांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मग आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने विमा संरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी घेतला आहे.

आणि त्यासाठी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. की ही योजना नेमकी काय आहे कशी आहे आणि वारकरी विमा संरक्षण, वारकरी बांधवांना नेमकी कसे मिळणार आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला आहे.

लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण असणार आहे. वारीदरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात ,आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी. या उद्देशाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे त्या योजने मधील एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या कुटुंबीयांस पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान हे देण्यात येईल.

त्याचप्रमाणे दुर्घटनेत कायमची अपंगत्व किंवा विकलांत आल्यास एक लाख रुपये देण्यात येतील तर अंशतः अपंगत्व आल्यास पन्नास हजार रुपये देण्यात येतील वरील आजारी पडल्यास औषध उपचारासाठी 35 हजार रुपयांपर्यंतचा खर्च हा मिळणार आहे तरी वारकरी बांधवांनो विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजनेची जी काही घोषणा आता करण्यात आली आहे.

त्यातील या काही महत्त्वाच्या बाबी आहेत तर अशा पद्धतीने विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजनेअंतर्गत वारकरी बांधवांना विमा कवच हे मिळणार आहे. वारकरी बांधवांनो या योजने संदर्भातील सविस्तर आणि विस्तारित माहिती ज्यावेळेस आपल्यासमोर येईल त्यावेळेस नक्कीच त्यासंदर्भातील माहिती आपण पाहूया…

Leave a Comment