पिक विमा 2022 – 23

पिक विम्याच्या संदर्भात शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे.मागील दोन वर्षांचा प्रलंबित असलेला पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे.

होय मागील काही दिवसापासून प्रलंबित पीक येण्याची रक्कम शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

संपूर्ण माहिती आपण आज या अपडेट मध्ये बघणार आहोत. शेतकऱ्यांना पिक विमा अतिवृष्टीची मदत न मिळाल्यास मुंबईत असलेल्या पिक विमा,

कंपनीच्या कार्यालयाच्या विसाव्या माळ्यावरून अनेक शेतकऱ्यांसोबत आपण उड्या मारू अशा इशारा रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेला बोलताना दिला यासाठी मुंबईत मोठे आंदोलने करणार,

असल्याचे तुपकर यांनी सांगितले आहे त्यानुसार लगेचच तुम्ही येथे बघू शकता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला अखेर यश आले बुलढाणा जिल्ह्यातील तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाई चे पैसे जमा होत आहे.

त्याचबरोबर राज्यातील इतरही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे शेतकऱ्यांचे हक्काचे पीक विम्याचे पैसे जमा होत आहे अनेक शेतकऱ्यांना आलेले मेसेज तुम्ही येथे बघू शकता.

दिनांक 16 तारखेपासून एआयसी कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आंदोलनाच्या दणक्याने उर्वरित 7855 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 13 कोटी 39 लाख रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

अजून जोपर्यंत राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे जमा होत नाही तोपर्यंत आंदोलनाच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत असे शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.

सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

यानुसार आता बुलढाणा जिल्ह्याबरोबरच राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Leave a Comment