शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.

नुकसान भरपाई वाटपासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रति हेक्टर 22,500 रुपये मदत शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

 आज झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयाच्या माध्यमातून स्पष्टरित्या माहिती देण्यात आली आहे सविस्तरित्या हे मंत्रिमंडळ निर्णय आपण पाहूया शेतकरी बांधवांनो आज झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक हेक्टर 22,500 दिले जाणार आहेत.

अशी माहिती या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये स्पष्टरित्या देण्यात आली आहे सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 1500 कोटी रुपयास मंजुरी देण्यात आली आहे.

 गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना ₹1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

बैठकीच्या अध्यक्षता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल.

सततच्या पाऊस ही राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित करून मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या 5 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.

याप्रमाणे शेती पिकांच्या नुकसाने करिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने ही निकषानुसार मदत देण्याचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत.

त्यानुसार पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 8,500 बागायत पिकांच्या नुकसानासाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 22,500 प्रति हेक्टर अशी दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही मदत दिली जाणार आहे.

अतिशय महत्त्वपूर्ण हे निर्णय आहे अनेक लाभार्थ्यांना नक्की माहिती असायला पाहिजे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा कारण आजच्या मंत्रिमंडळ निर्णयाच्या माध्यमातून नुकसान भरपाई लाभार्थ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर ही वितरित केली जाणार आहे…

Leave a Comment