महाराष्ट्रात तयार होणार 22 नवीन जिल्हे

महाराष्ट्रात होणार नवीन जिल्हे सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि आपण बघितले तर महाराष्ट्रात एक ऑगस्ट 2014 च्या वेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते तेव्हा ते असताना ठाणे जिल्ह्याचे त्यांनी विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती केली राज्यात 36 जिल्हे तयार झाले सध्या महाराष्ट्रात क्षेत्र फळात अशा जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार होणार आहेत तेव्हा किती नवीन जिल्हे तयार होणार आणि कोणकोणते होणार आहेत हे सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये वाढती लोकसंख्या आहे त्या वाढत्या लोकसंख्येमुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांवरती कामाचा बोजा वाढत चालला आहे तसेच काही जिल्ह्यांचे भौगोलिक अंतर हे मोठे असल्याने जिल्ह्याचे शेवटच्या टोकापर्यंत एखाद्या नागरिकाला जर समजा काही कामानिमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल तर त्याला पूर्ण एक दिवसाचा वेळ द्यावा लागतो अशा नेत्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो म्हणून अशा मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार करावे अशी मागणी या जिल्ह्यातील नागरिक करत आहेत तर मित्रांनो या गोष्टी विचारात घेता महाराष्ट्रात नवीन एकूण 22 जिल्हे तयार होणार आहेत आणि हे 22 नवीन जिल्हे कोणकोणती असतील पहा अहमदनगर या मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर शिर्डी आणि संगमनेर येथील नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार आहे त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण या दोन जिल्ह्यांची निर्मिती होऊ शकते पालघर जिल्ह्याचे विभाजन करून जव्हार नवीन जिल्हा तयार होणार आहे त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून मीराभाईंदर कल्याण हे दोन नवीन जिल्हे बनवणे प्रस्तावित आहे पुणे जिल्ह्याचे विभाजन करून शिवनेरी हा जिल्हा तयार होणे प्रस्तावित आहे त्याच्यानंतर रायगड जिल्ह्याचे विभाजन करून महाड हा नवीन जिल्हा तयार केला जाणार सातारा जिल्ह्याचे विभाजन करून माणदेश हा नवीन जिल्हा होणे प्रस्तावित आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याची विभाजन करून मानगड हा नवीन जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे त्याच्यानंतर बीड जिल्हा विभाजित करून आंबेजोगाई हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे आणि लातूर जिल्ह्याचे विभाजन करून उदगीर व नांदेड जिल्ह्यातून किनवट हा नवीन जिल्हा तयार होणार आहे त्याच्यानंतर जळगाव मधून भुसावळ बुलढाणा मधून खामगाव हे जिल्हे तयार होणार आहेत तसेच अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून अचलपूर हा नवीन जिल्हा तयार होणार आहे यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून पुसद हा जिल्हा तयार केला जाणार आहे त्याच्यानंतर भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून साकोली चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हे जिल्हे तयार केले जाणार आहेत तर अशाप्रकारे मित्रांनो महाराष्ट्रात हे 22 नवीन जिल्हे तयार होऊ शकतात तसेच मित्रांनो हे जे 22 नवीन जिल्हे तयार होणार आहेत त्या ठिकाणी प्रतीक्षे नागरिकांकडून मागणी आहे तर काही ठिकाणी याचा विरोध पण होत आहे तुम्हाला काय वाटते हे नवीन जिल्हे तयार व्हायला पाहिजेत की नाही…

Leave a Comment