योग दिंडी आपल्या दारी बीड…

*योग दिंडी आपल्या दारी अभियान* काकू नाना प्रतिष्ठान व पतंजली योग समिती बीड यांच्या संयुक्त विद्यमाने *जागतीक योग दिनाच्या* निमित्ताने बीड वाशीयांकरिता योग दिंडी आपल्या दारी हे अभियान दि 4 जून 2023 पासून पहाटे 5 ते 7 या वेळेमध्ये प्रारंभ होत आहे , तरी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.. *स्थळ: सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथि मेडिकल कॉलेज बीड*. *वेळ: पहाटे 5 ते 7* *श्रीराम लाखे 9822670053*

योगा आरोग्यासाठी अतिश्य फायदेशीर (Yoga Benefits) असतो. नियमित योगा केल्याने शरीर आणि मन निरोगी राहण्यास मदत (Benefits Of Yoga) होते. नियमित योगा केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढतं.

सध्याच्या धाधावपळीच्या आयुष्यामुळे अनेकांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु योगा केल्याने या सर्व समस्या दूर (Benefits Of Yoga In Marathi) होण्यास मदत होते. याशिवाय कामामुळे उद्भवणारा तणाव, चिंता आणि नैराश्य दूर करण्यासाठी देखील योगा मदत (Yoga Importance) करू शकतो. योगा अनेक प्रकारे
वेगवेगळ्या आसनांच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. जाणून घेऊया योगा करण्याचे फायदे (Importance of Yoga).

योगाचे तीन प्रमुख फायदे

योगा केल्याने माणसाला तीन प्रकारचे फायदे होतात. पहिला फायदा शरीराला होतो. योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे योगा केल्याने शरीर सुदृढ आणि निरोगी ठेवण्यास मदत होते. यामुळे शरीर नेहमी उर्जावान राहते आणि उत्साह वाढतो. दुसरा फायदा म्हणजे योगा केल्याने बुद्धी आणि विचारांवर सकारात्मक परिणाम होतो. योगामुळे नकारात्मक विचार, तणाव आणि चिंता दूर होतात आणि मानसिक विकारांपासून व्यक्तीचे संरक्षण होते. नैराश्यात जाण्यापासून वाचवण्यासाठी योगा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तिसरा फायदा म्हणजे माणसाची सर्व चिंतापासून मुक्ती होते.

Tulsi Upay: तुळशीचा हा सोपा उपाय आहे मोठ्या कामाचा; अमावस्येला केल्यास अधिक लाभतो

Morning Routine : सकाळी नाश्त्यात चुकूनही खाऊ नका या गोष्टी, अन्यथा आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

औषधाशिवाय यूरिक अ‍ॅसिड राहील नियंत्रणात, फॉलो करा या 5 टिप्स

Mango Side Effects: भरपूर आंबे खाताय? तर सावधान! डायबिटीजसह या 5 आजारांचा वाढेल धोका

नियमित योगा करण्याचे फायदे

वृद्धावस्थेत आजार राहतात दूर : तारुण्यात शरीर जेवढे सक्रिय आणि उर्जावान असते तेवढे ते वृद्धावस्थेत नसते. त्यामुळे तारुण्यात नियमित आणि योग्य प्रमाणत योगा केल्याने शरीर सुदृढ आणि निरोगी बनते. यामुळे वृद्धत्वात अनेक आजार दूर राहण्यास मदत होते. त्यामुळे तरुण वयापासूनच योगा केला तर वृद्धावस्थेत आरोग्याच्या कमी समस्या उद्भवतात.

लठ्ठपणा दूर करण्यासाठी उपयुक्त

चुकीची आहार शैली आणि अनियमित आहार यामुळे बऱ्याच लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. लठ्ठपणामुळे अनेक आजार देखील उद्भवतात. पंरुत योगा करुन तुम्ही तुमचं वजन नियंत्रणात ठेवू शकता. अशी अनेक आसनं आहेत जी केल्याने तुमची पचनक्रिया व्यवस्थित होते आणि शरीरात चरबीची निर्मिती आणि प्रमाण कमी होते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त

अनियमित आणि अयोग्य आहार आणि जीवनशैलीमुळे अनेकांना कमी वयातच मधुमेहासारख्या आजाराचा सामना करावा लागत आहे. परंतु योगा केल्याने तुम्हाला शरीरातील साखरेची पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. शरीरात इन्सुलीनचं प्रमाण कमी झाल्यास साखरेची पातळी वाढते. अशा स्थितीत नियमित योगा केल्यास साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

तणाव दूर होतो

आजकालच्या संघर्षमय आयुष्यामुळे प्रत्येकालाच मोठ्या प्रमाणत धावपळ आणि काम करावे लागते. यामुळे बऱ्याचदा तणाव जाणवतो. परंतु नियमित योगा करून तणावपासून मुक्ती मिळवता येऊ शकते. यासाठी दररोज सकाळी उठून प्राणायाम आणि मेडिटेशन करावे. यामुळे दिवसभर उर्जावान आणि उत्साही वाटते.

ह्रदय निरोगी राहते

योगा केल्याने तुमचे ह्रदय निरोगी राहते. तसेच शरीरातील रक्ताभिसरण देखील वेगाने होते. प्राणायाम केल्याने ह्रदयापर्यंत पुरेसा प्राणवायू पोहचवण्यास मदत होते. त्यामुळे रक्त शुद्ध होते आणि शरीर देखील निरोगी राहण्यास मदते होते. याशिवाय योगासनांमुळे सर्वच अवयवांचा व्यायाम होतो. प्राणायामामुळे श्वासोच्छवास सुरळीत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते.

*बारा मूलभूत असणे*

आसन हे शास्त्रीय योगाच्या आठ अंगांपैकी एक आहे आणि असे म्हणते की पोझ स्थिर आणि आरामदायी, दृढ परंतु आरामशीर असावेत. योग आसन आपल्याला आपले शरीर, मन आणि पर्यावरणाबद्दल अधिक जागरूक होण्यासाठी हळूवारपणे प्रोत्साहित करतात. 12 बेसिक पोझेस किंवा आसन फक्त स्ट्रेच करण्यापेक्षा बरेच काही आहेत.

Leave a Comment