शेतकऱ्यांविषयी महत्त्वाचे निर्णय…

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान योजना तसेच पीएम किसान निधी योजना विषयी सुद्धा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर कोणकोणते निर्णय या मंत्रिमंडळात घेण्यात आलेले आहेत याविषयी आपण इथे माहिती पाहू मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते तर या ठिकाणी पहिला महत्त्वाचा नियम आहे

✅ कामगारांची सुरक्षा, आरोग्य, कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना मान्यता. लाखों कामगारांचे हित जपले.
✅ केवळ एक रुपयात पिक विमा योजनेचा लाभ देणार. लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
✅ नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबविणार. पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारणार.
✅ ‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन’ योजनेस मुदतवाढ. योजना आणखी तीन जिल्ह्यात राबविणार.
✅ सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापन करणार. 22.18 कोटी खर्चास मान्यता
✅ महिलांना पर्यटन व्यवसायात अधिक वाव देण्यासाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण
✅ राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास मान्यता. 95 हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार
✅ कापूस उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता. 25 हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार
✅ सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक व्हावे म्हणून क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट. अधिनियमात सुधारणा करणार
✅ बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विका- सास मोठे प्रोत्साहन मिळणार. अधिमुल्यात 50 टक्के सवलतीचा निर्णय
✅ अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांत प्राध्यापकांची 105 पदांची निर्मिती करणार
✅ नांदुरा येथील जिगाव प्रकल्पाला गती देणार. अतिरिक्त 1710 कोटीच्या खर्चास मान्यता
तर अतिशय महत्त्वाचे असे निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेले आहेत…

Leave a Comment